You are currently viewing महाद्वारकाला

महाद्वारकाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”महाद्वारकाला”*

 

वारीची सांगता होते गोपाळ काल्यानं

पौर्णिमेला जमती गोपाळपुरात जन।।धृ।।

 

त्याकाळी कान्हा हरिदास होते विठूभक्त

नित्य काकड आरती करिती पूजा पाठ

सेवा करिती अभंग गायन कीर्तन ।।1।।

 

पांडुरंग महाराज करिती सेवा अखंड

विठूने दिल्या खडावा भेट भक्ती पाहून

देवाज्ञे होतो काला शिरी खडावा लेऊन।।2।।

 

पादुकाधारींना होते समाधी अवस्था प्राप्त

नामदास घेती खांद्यावर पादुकाधारीस

पाच प्रदक्षिणा करिती विठुनाम घेऊन।।3।।

 

काल्याचा अभंग होतो दहिहंडी फोडून

बुक्का कुंकू लाह्या दही वाटती प्रसाद

वारीची सांगता सोहळा होतो संपन्न।।4।।

 

चिंब भिजती वारकरी भक्ती रसांत

जडपायी मने पंढरीचे घेती दर्शन

घरी परतती काल्याचा प्रसाद घेऊन।।5।।

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड. महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा