वेंगुर्ले येथील उद्योजक विलास सावंत यांचे निधन
वेंगुर्ले
वेंगुर्ला मेनरोड भटवाडी येथील रहिवासी उद्योजक विलास उर्फ बाळू गणपत सावंत (५८) यांचे ९ जुलै रोजी सकाळी ७.३०च्या दरम्याने हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, १ जावई, भाऊ, भावजय, बहिणी असा मोठा परिवार आहे. ‘लता गुड्स ट्रान्सपोर्टचे मालक तथा माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत यांचे ते बंधू होत.

