You are currently viewing दुःखाच्या अथांगतेला भेदणारा सूर्य

दुःखाच्या अथांगतेला भेदणारा सूर्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम कथा*

 

*दुःखाच्या अथांगतेला भेदणारा सूर्य*

 

अचानकपणे कर्कश आवाज करत ट्रेन थांबली. मुंबईत पोहचायला अजून थोडासा अवधी होता, पण हे कुठचेही टेशन नव्हते मग एवढी तात्काळ गाडी का थांबली….?

काही कळायच्या आतच बुरखे घातलेली हत्यारबंध माणसे एकदम गाडीच्या डब्यात घुसली. काय होतंय हे कळायच्या आतच ती लोकांवर वार करत सुटली. तिचे आई-बाबा मारले गेले, रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही देह एक साथ पडले. ती पुढे होणार एवढ्यात एका मजबूत हाताने तिला पकडले, जवळजवळ खेचून, उचलून ट्रेनच्या बाहेर आणले. बाजूला असलेल्या गर्द झाडी तिला बसवत तो बोलला “इथेच थांब थोडा वेळ” तोच ट्रेनमध्ये धुवांधार गोळीबार सुरू झाला. थरकाप उडणाऱ्या आवाजांनी कानठळ्या बसत होत्या. ती बेशुद्ध झाली होती.

तिने डोळे उघडले, कोणीतरी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. ती तीच व्यक्ती असावी जीने तिला आणून या झाडीत लपवले होते.

माझ्याजवळ पर्याय नाही, तुला इथून हलवणे गरजेचे आहे. गेले दोन तास तू इथेच निपचित पडली आहेस. थोडं मनोबल वाढव आणि मला तुलाच वाचविण्यासाठी मदत कर. ती कण्हत म्हणत होती… “आई-बाबा”

तो सोबतीला आणखी एक व्यक्ती घेत तिला उचलतो. दोघं मिळून तिला गाडीत बसवतात. गाडीच्या प्रकाशात ती बघते ते दोघेही बरेच जखमी झालेले असतात. तो हळुवारपणे तिच्या हातावर थोपटतो आणि गाडी भरधाव हॉस्पिटलच्या दिशेने निघते.

पुढचे तीन चार दिवस ती हॉस्पिटलमध्येच होती. खरंतर तिला काहीच लागलं नव्हतं पण ती पूर्णपणे ग्लानीतच होती. तिचे शरीर जणू चेतनाहीन झाले होते. तरतरीत राहण्यासाठी तिला ग्लुकोज लावले होते.

प्रसन्न चेहऱ्याने एक नर्स बोलली, गेले चार दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहात. जरा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा.

ती डोळे उघडत म्हणते अन् थोडं पाणी मागते

नर्स तिला पाणी पाजते आणि तिचे नाव विचारते…

“पूर्वा”… ती डोक्यावर भार देत आठवत सांगते…

“पण मी इथे कशी..?”

नर्स तिला सांगते…

तुला वाचवणारा एक मोठा पोलीस अधिकारी आहे. प्राणाची भाजी लावून त्यांनी कित्येकांचे प्राण वाचवले, जखमी अवस्थेत ते तुला घेऊन इथे आले.

पूर्वा हळूहळू बोलते “ते कुठे आहेत ?आणि माझे आई बाबा,….

मला फारसे काही माहीत नाही असं म्हणत ती निघून गेली.

पूर्वा विचार करत होती, आठवण्याचा प्रयत्न करत होती.

तेवढ्यात तो तरुण आत आला त्याला बऱ्याच ठिकाणी पट्टी केली होती. तो थोडा हसून बोलला ‘जागी हो ना किती ते झोपशील….?

पण माझे आई-बाबा….?

तो स्टूल ओढून बसला, हळुवारपणे तिचा हात थोपटत बोलला..

मी तुमच्याच डब्यातून प्रवास करत होतो, अचानक आतंकवादी हल्ला झाला. तुला अगदी सही सलामत वाचवण्यात मला यश आलं. तुला झाडीत लपवून मी पोलीस फौज मागवली आणि तोपर्यंत जीवाची बाजी लावून लढलो’.

तो एक मोठा पोलीस अधिकारी होता. अनेक गोष्टी पार पाडता पाडता तुझ्यापर्यंत परत यायला मला दोन तास लागले. तू बेशुद्ध अवस्थेत तिथेच होतीस. तुला सुखरूप पाहून माझ्या जीवात जीव आला. अगं मी तुला सर्वात प्रथम बाहेर काढलं अगदी सहीसलामत.. पण तू ग्लानीत होतीस तुला झाडीत लपवून मला जावं लागलं.

तू दोन तास तरी झाडीत तशीच अचेत पडली होतीस. पण नंतर माझ्याही जीवात प्राण नसतानाही, तुला घेऊन आम्ही हॉस्पिटलला आलो. माझा मेंदू शीणला होता. प्रत्यक्ष डोळ्यासमोरील ती दृश्य, शारीरिक इजा, डोळे, बुद्धी ,विचार यांची सांगड घालताना होत असलेले परिश्रम यांनी मीही थकलो होतो. पण आता तुझ्यासमोर बसलो आहे. तू मात्र अजूनही डोळे उघडायला तयार नाहीस. सावर स्वतःला तो जरा हसूनच म्हणाला.

डोळे किलकिले करत अर्धवट उघडत तिने विचारले माझे ‘आई-बाबा..’..?

त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हतं.

हताशपणे तो म्हणाला मी डब्यात असतानाही कित्येकांना नाही वाचू शकलो. पण तरीही कितीतरी जणांचे प्राण वाचवले, पण तुझ्या आई-बाबांना नाही वाचू शकलो. तू कोमातच असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. ती फार दुःखी झाली, ओक्साबोक्शी रडली. त्याने तिला आधार दिला.

त्याच्या आश्वासक नजरेने तिला बरं वाटलं..

तो म्हणजे पोलीस अधिकारी विराज…!

तो तिला घेऊन घरी आला. त्यांचं फार मोठं एकत्र कुटुंब होतं. तो जास्त तर ड्युटीवर असायचा ती त्याच्या रूम मध्ये राहायची. तो आला की हॉलमध्ये झोपायचा. पण हे असं जास्त दिवस चालणार नव्हतं.तिला एकटीला तिच्या घरी सोडणं शक्य नव्हतं आणि जे नातेवाईक होते त्यांनी जबाबदारी घेणे टाळलं होतं.

पूर्वाच्या कानात आवाज पडत होता हॉलमध्ये आई बोलत होती. ‘अरे राज काय तो निर्णय घे.’ ‘तुझ्या निर्णयावर आमचा विश्वास आहे’ बाबा बोलत होते. तो मात्र गप्पच होता.

घरात बरच काही चाललं होतं पण तिच्यापर्यंत काहीच येत नव्हतं. ती विचार करून करून शीणली होती.

तोच दरवाजावर नॉक करून विराज आत आला. जवळ येऊन बोलला आपल्याला बाहेर जायचं आहे तयार हो.

तिनेही प्रश्न केला नाही, तयार होऊन त्याच्याबरोबर निघाली.

तो शांतपणे गाडी ड्राईव्ह करत होता.. एका पार्क जवळ तो थांबला. एका बाकड्यावर बसत तो बोलला, ‘पूर्वा, मला तुझ्याबद्दल फारसं काहीच माहित नाही, पण तू सायबर क्राईम फिल्डला आहेस..एम टेक च्या पहिल्या वर्षाला, तू ज्या फिल्ड मध्ये आहेस तेथे कमजोर असून चालत नाही.

बरेच प्रश्न उभे आहेत.

तुझी हरकत नसेल तर आपण लग्न करूया का? हा माझा निर्णय आहे, पण त्यानंतर तुझे निर्णय तू घेऊ शकशील.

त्यानंतर तो तिला मॅरेज रजिस्टर ब्यूरो मध्ये घेऊन येतो.

लग्नाच्या सर्व फॉरमॅलिटीस पार पाडून दोघं घरी येतात ते नवरा बायको बनूनच.

सारेच आवक होऊन कुजबुजू लागतात.

आई बाबा मात्र स्वागत करतात.

‘ये मुली, हे माप ओलांडून घरात ये. आता तू या घरची लक्ष्मी आहेस आमची सून आहेस, आत ये .

खोलीत मंद लाईटच्या प्रकाशात ती खिडकी जवळ एक हात टेबलावर ठेवून उभी होती. गेल्या काही दिवसात तिच्या जीवनात किती उलथापालथ घडली होती. आणि ती मात्र नियतीच्या हातची बाहुली बनली होती.

विराज आज तिचा जीवनसाथी झाला होता..

“जीवनसाथी”..? या शब्दावर ती अडखळली

तो म्हणाला होता की आता ती तिचे निर्णय घेऊ शकत होती.

निर्णय…? कुठले..? कसे घेणार आहोत आपण…?

परत तिची विचार साखळी तुटली.

विराज येऊन मागे उभा राहिला होता त्याने हाक दिली “पूर्वा”..

ती एकदम शहारली, पहिली रात्र ..आपली..

त्याचा शांत आवाज तिच्या कानी पडला .

“पूर्वा “अगं मला आणखी काही सुचलं नाही. आता मी तुझं शिक्षण पूर्ण करेन. तू सुरक्षितपणे माझ्या घरात राहू शकशील. ही खोली तुझी आहे आता तुला कोणी प्रश्न करणार नाही. तुझं शिक्षण पूर्ण करेपर्यंत तू माझी जबाबदारी आहेस

रागावू नकोस, पण तुला वाऱ्यावर सोडणं मला जमणार नव्हतं.

असंख्य प्रश्नांचे मोहोळ डोक्यात असतानाही ती काहीच बोलली नाही.

दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये तिचंॲडमिशन झालं. त्यांने तिला कॉलेजला जाण्यासाठी नवीन गाडी घेऊन दिली. तिचं रोजचं नवीन रुटीन सुरू झालं. आता ती पूर्वा विराज गावस्कर होती. आता तिचं जीवन परत बिझी झालं. कॉलेज वरून घरी आली की ती त्याच्या लॅपटॉप वर काम करायची, स्वतःचा विचार करायला ही आता तिच्याजवळ वेळ नव्हता.

खोलीत टेबलापाशी बसून ती काम करत होती. तिचा सर्व लक्ष लॅपटॉप मध्ये होता डोळे विस्फारून ती बोलली ,’अरे ही तर ए आय ची कमाल”.

आणि तिला पाठीमागून हाक ऐकू आली… आई म्हणत होती चहा घे काम करायला उत्साह वाटेल.

बाबा म्हणत होते ‘पोरी काम कर पण स्वतःचे अस्तित्व नको विसरूस, आम्ही तुझेच आई-बाबा आहोत.’

तिला एकदम मोठा हुंदका फूटला. आज पर्यंत ती रडलीच नव्हती. आई म्हणत ती तिच्या कुशीत शिरली. बाबा तिच्या केसातून हात फिरवू लागले.

तोच विराज पेढ्याचा पुडा हातात घेऊन आत आला. समोरील दृश्य पाहून थबकला, मग जवळजवळ ओरडलाच…

पूर्वा तू पूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने पास झाली आहे.

आई बाबा तोंड भरून

आशीर्वाद देऊन बाहेर निघून गेले.

पूर्वा आज एवढ्या अंधाऱ्या भयाण रात्री नंतरची रम्य पहाट अनुभवत होती. तिच्या मनातला तो सूर्य प्रकाशित होत होता.

ती त्याच्या निळ्याशार डोळ्यात खोल बुडाली होती.

तिच्या अस्तित्वाच्या खुणा पुसणाऱ्या, सागराला भेदणारा प्रकाशित करणारा सूर्य तिला त्याच्या डोळ्यात सापडला होता.

 

सौ. स्नेहा धोडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =