You are currently viewing सर्व्हर डाऊन ची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली दखल

सर्व्हर डाऊन ची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली दखल

सर्व्हर डाऊन ची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली दखल

संबंधित प्रशासनाला केल्या सूचना ; तात्काळ सर्व्हर सुरू

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रतिज्ञापत्र व दाखले अपलोडींगचे काम ठप्प झाले होते. यासंदर्भात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधत प्रतिज्ञापत्र वेळेत देण्याबाबत नियोजन करा, अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संचालक महाऑनलाईन यांच्याशी संपर्क साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या महाऑनलाईनच्या सर्व्हरबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थी, पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याबाबत कल्पना दिली. त्यानंतर दुपारपासून जिल्ह्यातील महाऑनलाईनचा सर्व्हर चांगल्याप्रकारे काम करत असल्याने प्रतिज्ञापत्रांच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही समस्या मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा