You are currently viewing मुलुंड गुरुस्थानी गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन 

मुलुंड गुरुस्थानी गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

मुंबई : प. पू. सद्गुरू श्री समर्थ राऊळ महाराज दत्त प्रसाद भक्त मंडळ, मुलुंड (पूर्व) गुरुस्थान यांच्यावतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा आणि श्री गुरूपाद्यपुजा महाअभिषेक आषाढ शु.१५ शके १९४७ गुरूवार दि. १० जुलै २०२५ रोजी डी/५, औदुंबर सोसायटी, म्हाडा कॉलनी, मुलुंड ( पूर्व) मुंबई – ८१ येथे साजरा करण्यात येणार असून सकाळी ८.३०ते ९ या वेळेत नित्यनैमित्तिक पूजेने प्रारंभ होऊन श्री गुरू पाद्यपुजा महाअभिषेक, श्री गुरुचरित्र पारायण, महाआरती, महाप्रसाद, नामस्मरण सुस्वर भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी समस्त भक्त मंडळींनी उत्सवास सहभागी होऊन आनंदाची लुटी करावी असे श्री समर्थ राऊळ महाराज दत्त प्रसाद भक्त व कार्यकारी मंडळ यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा