केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सध्या त्यांचा तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर होताना नोकरदार वर्गाचं लक्ष असतं इनकम टॅक्सवर.
निर्मला सीतारमण यांनी गेल्यावेळी म्हणजेच 2020 मध्ये इनकम टॅक्समध्ये काही बदल केले आहेत. सध्या करदात्यांना करभरणा करण्यासाठी सरकारने दोन पर्याय दिले आहेत.
त्यानुसार करसवलतीसाठी जुन्या टॅक्स स्लॅब नुसार करभरणा करायचा की करसवलत न घेता नवीन नियमांप्रमाणे, हे करदात्याला ठरवायचं आहे.
त्याचं कोष्टक खालील प्रमाणे आहे.
येत्या 2021-22 या आर्थिक वर्षात नेमक इन्कम टॅक्स किती वाढले आणि किती कमी होईल हे थोड्याच वेळात समजेल.
पण 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला टॅक्स रिबेट मिळत असल्याने त्या उत्पन्न गटातील लोकांना टॅक्स भरायची गरज नव्हती.
निर्मला सीतारमण यांनी गेल्यावेळी म्हणजेच 2020 मध्ये इनकम टॅक्समध्ये काही बदल केले आहेत. सध्या करदात्यांना करभरणा करण्यासाठी सरकारने दोन पर्याय दिले आहेत.
त्यानुसार करसवलतीसाठी जुन्या टॅक्स स्लॅब नुसार करभरणा करायचा की करसवलत न घेता नवीन नियमांप्रमाणे, हे करदात्याला ठरवायचं आहे.
त्याचं कोष्टक खालील प्रमाणे आहे.
2020 मध्ये करव्यवस्थेत कोणते बदल झाले?
गेल्या वर्षीच्या नव्या पर्यायी व्यवस्थेत चार ते पाच टॅक्स स्लॅब आहेत.
5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर पूर्वी 20% कर भरावा लागायचा. आता त्यात कपात करून तो 10% करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे 7.5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर पूर्वी 20% दराने कर भरावा लागायचा. तो आता 15% दराने द्यावा लागत आहे.
10 ते 15 लाख रुपयांच्या स्लॅबवर पूर्वी 30% कर भरावा लागायचा. आता त्याचेही दोन भाग करण्यात आले आहेत – 10 ते 12.5 लाख रुपयाच्या उत्पन्नावर 20% तर 12.5 ते 15 लाख पर्यंतच्या स्लॅबसाठी 25% दराने कर भरावा लागत आहे.
15 लाख रुपयांच्या वर उत्पन्न असेल तर पूर्वीही 30 टक्के दराने इनकम टॅक्स भरावा लागायचा. आताही त्याच दराने कर भरावा लागत आहे.
मात्र, या सर्वांसाठी काही अटी घालून दिल्या आहेत. अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्वी करमुक्त होतं. आता हा स्लॅब पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.
असा असेल बजेट..
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच पेपरलेस पद्धतीचं असं हे बजेट असेल.
काही दिवसांपूर्वीच सीतारामण यांनी युनियट बजेट मोबाईच अपचं अनावरण केलं होतं. अर्थसंकल्पाशी निगडीत सर्व दस्तावेज या अपवर उपलब्ध असतील.
अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे.
कोरोना संकटानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे झालेला विपरीत परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केला होता. आगामी आर्थिक वर्षात जीडीपी 11 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.