You are currently viewing पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग येथे इ. 6 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग येथे इ. 6 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग येथे इ. 6 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

 सिंधुदुर्गनगरी

शिक्षण मंत्रालयभारत सरकारव्दारा संचलित जिल्ह्यातील सांगेली  येथील नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत नवोदय विद्यालय समितीनोयडा (दिल्ली) यांच्याकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असूनप्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती https://navodaya.gov.in   या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेतअसे आवाहन पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयचे प्राचार्य अशोक कांबळे यांनी केले आहे.

प्रेवश अर्ज भरत असताना पालकांची सही, विद्यार्थ्यांची सही, विद्यार्थ्यांचा फोटो आवश्यक  आहे. तसेच खुला प्रवर्ग सोडून, इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीचे प्रमाणपत्र सुध्दा जोडणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी इतर मागास प्रवर्गात (OBC) येतात त्यांनी केंद्राचे FROM No 9 (Creamy/ Layer) प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.  तसेच रहिवाशी प्रमाणपत्र हे सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले असावे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 पर्यंत असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. प्रवेशा संबंधी अधिक माहितीसाठी 02363 242713, अशोक कांबळे मोबा. 9146098400 व परीक्षा प्रमुख जे.बी. पाटील मोबा.9420294584 आणि एस.पी. हिरेमठ मोबा.7447606149 या दूरध्वनी क्रमांवर संपर्क साधावा. 

प्रतिक्रिया व्यक्त करा