You are currently viewing एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

महाविद्यालयात नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार

सिंधुदुर्ग :

जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एमबीबीएस अभ्यासक्रमास पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्याथ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाला विहित वेळेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून रेकग्निशन प्राप्त झाले आहे. सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षांमध्ये एकूण ७५० विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेणार असून १५० विद्यार्थी आंतरवासियता पूर्ण करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा