You are currently viewing तुझी आठवण

तुझी आठवण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

*तुझी आठवण*

 

आभाळ भरून आले

की तुझी आठवण येते

बेधुंद गारव्याने

अंग अंग शहारून जाते

 

मग तुझ्या आठवणीत

चहाचा एक एक घोट घेतो

खिडकीत उभा राहून

तुझी वाट पहातो

 

ढग गरजायला लागले की

पाऊस तुला खूणावतो

मुक्त होऊन फक्त आणि फक्त

तुझ्यासाठीच ओथंबून वाहतो

 

खरतर तुझ आणि पावसाचं नातं

फार काही जुन नाही

रिमझिम बरसतो पाऊस आणि

तू भिजणं असं कधी झालं नाही

 

खरं सांगू का

पावसाला ही तुझी सवय झाली

म्हणून तू चिंब चिंब भिजत असते

मी बनवलेली कागदाची नाव

तुझ्याशिवाय वाहत नसते

 

पावसाने ना तुझ्यासाठीच उधाण व्हायचं

सैरभैर होऊन तू कवेत घ्यायचं

आणि मी खिडकी उभा राहून

तुला एकसारखं पहात रहायचं

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा