विष्णूप्रसाद सावंत यांनी साकारले बापूसाहेब महाराजांचे पेन्सिल स्केच….
सावंतवाडी
येथील बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथील अंतिम वर्षाचा विद्यार्थी विष्णूप्रसाद संतोष सावंत याने बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे अप्रतिम पेन्सिल स्केच साकारून एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे. विष्णूप्रसादने हे विशेष स्केच बापूसाहेब महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात भेट केले.
याप्रसंगी राजे खेमसावंत भोसले लखमराजे भोसले, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विष्णूप्रसादने आपल्या कलेतून बापूसाहेब महाराजांना आदरांजली वाहिल्याने उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. एका विद्यार्थ्याने इतक्या संवेदनशीलपणे आणि कलात्मकतेने ही आदरांजली अर्पण केल्याने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. विष्णूप्रसाद सावंतच्या या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि बापूसाहेब महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यास मदत केली.
