You are currently viewing मुंबई लोकल सर्व सामान्यांची “लाईफलाईन” पुन्हा रुळावर 

मुंबई लोकल सर्व सामान्यांची “लाईफलाईन” पुन्हा रुळावर 

मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणार्‍या मुंबई लोकल ट्रेनविषयी आनंदाची बातमी गेल्या आठवड्यात राज्य सरकारने दिली. त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी एक फेब्रुवारी २०२१ म्हणजेच आजपासून होत आहे. सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू झाली आहे, ट्रेनमध्ये जास्त गर्दी नसतानाच्या वेळा निर्धारित करून सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन असल्याचे मानले जाते जी आजपासून सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आहे.आज सकाळी ठाणे स्थानकातून मुंबईकडे सामान्यांसाठी पहिली ट्रेन धावली, त्यावेळी सकाळी शेकडो प्रवाश्यांनी प्रवास करताना आनंद व्यक्त केला.

दिवसाच्या सुरुवातीला पहाटे पहिल्या ट्रेनपासून ते सकाळी सात पर्यंत आणि नंतर दुपारी 12 ते संध्याकाळी चार आणि रात्री नऊ ते लोकल सेवा संपेपर्यंत सर्वसामान्यांना लोकल उपलब्ध असतील.

This Post Has One Comment

  1. महेश पेडणेकर

    जनरल ड्युटीसाठी काही फरक पडत नाही मेट्रो पहिली फेरी ७.५० वा. आहे बस शिवाय सोय नाही रेल्वे सकाळचा वेळ ७.००वा.आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा