You are currently viewing निसर्गास पत्र

निसर्गास पत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शुभेच्छापत्र*

 

निसर्गास पत्र

 

प्रिय निसर्गा……

 

जसेही पाळण्यात डोळे उघडले तेव्हापासून निसर्गा ,तू नाना रुपात दृष्टीसमोर आहेसच.

मग घर असो की अंगण असो….. प्रेक्षणीय पर्यटन असो.तुझी ओढ कायम मनाला आहेच.

हिमालयाच्या सुंदर हिमाच्छादित रांगा..हिरवीगार झाडी असलेले गर्द डोंगर..कडे घाटमाथे…तुझ्याकडे बघताना मन विनम्र होतं.

तो अथांग सागर ,निळ्या निळ्याशार उंच फेनील लाटा..आणि हळूहळू किनाऱ्याकडे येणार्या लाटा बघताना भान हरवून गेले नाही तर नवलच!

तुझ्या आतील विविधरंगी दगड…तेही प्रांताप्रांतात वेगळे रंग धारण केलेले.. कुठे शुभ्र तर गुलाबी कुठे काळा कुळकुळीत तर कुठे विविधरंग एकत्र….त्यातून अनेक शिल्प,

मूर्ती कलावंत निर्माण करतात.ते

बघून नतमस्तकच होतो.

ईश्वरीय रूपाच्या कितीतरी छटा अनुभवत असते मी..

त्या वेली; ती वा-यासवे झुलणारी घोसात डोलणारी फुलं

गगनाशी स्पर्धा करणारे वृक्ष तर

तर शेतात डोलणारं हिरवं पीक आणि बांधावर उगवलेली झुडपी रानफुलं…

त्यावर असंख्य किटक,मधमाशा भुंगे…आणि सुंदर ,रंगीबेरंगी उडणारी फुलपाखरं….नजरेला तृप्त करतात..हिवाळा..उन्हाळा..पावसाळ्यात तुझे मोहक रंगबदलते रूपडे आणि ते इंद्रधनू…विजांचा लखलखाट…पावसाची टिपटिप..

अवघं नादब्रम्ह काळजात घुमतं…

जमिनीतील खनीज,,समुद्रातील

वेगवेगळे मासे व तळाशी तेजस्वी मोती..सारंच नजरेत न मावणारं…असा तू सर्वांग सुंदर मला फार आवडतोस.

मानवाने त्याच्या फायद्यासाठी तुझं खूप नुकसान केलं…मान्य

पण अनेकजण पर्यावरण जपण्याची मोहीम जबाबदारीने राबवत आहे…तू सुरक्षित तर मानव,प्राणी पक्षी ..हे चराचर सुरक्षित!

तू नाही तर आम्हीही नाही..ही तर दगडावरची रेघ!

आज शुभेच्छापत्रानिमित्य

तुझ्याशी बोलले..आंतरिक तळमळ दाटून आली…

तू असाच सदैव बहरत रहा..

आम्हाला नेत्रसुख देत रहा!

 

तुझ्या आठवणीत

अरुणा दुद्दलवार …दिग्रस

🌿🌺🍁🍃🍁🪴🌿🍁🍃

प्रतिक्रिया व्यक्त करा