You are currently viewing आषाढी

आषाढी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आषाढी*

 

जग बदलले रे देवा

पण तुझी पालखी काही थांबली नाही

आले किती गेले किती पण

तुझी आषाढी काही ला़ंबली नाही

 

मोबाईलच्या युगात ही म्हणे

माणूस तुझी भक्ती करतो

घरदार प्रपंच सार काही सोडून

वारी संगे पायी पायी चालतो

 

इथे कुणाचं कुणाशी काही नातं असतं का

तरी एकमेकांचा लळा लागतो

माणसा माणसांमध्ये पांडुरंगा

तुझ्या भक्तीचा सोहळा बघतो

 

टाळचिपळीचा नाद करून

एकमेकांच्या पाया पडतात

तुझ्या नामाचा गजर करून

माऊली माऊली म्हणतात

 

अरै विठू सावळ्या

असं काय तुझ्यात की

पोटात तुझ्या भक्तीची भूक असते

पायाला भेगा पडलेल्या असतात

तरी डोक्यावरची तुळस खाली उतरत नसते

 

तू म्हणजे ना एक चमत्कारच

तू चराचरात ठायी ठायी असतो

प्रत्येक वारकरीच्या कपाळी

चंदनाच्या टिळ्यात तू दिसतो

 

काही जरी झालं ना तरी

तुझे भक्त वारी चुकवत नाही

तुझ्या चरणी डोकं ठेवल्याशिवाय

तिर्थयात्रा होत नाही

 

म्हणून चंद्रभागेच्या तीरी

सारे संतजन एकत्र येतात

तुझ्या नावाचा गजर करून

तुला डोळेभरून पाहतात

 

खरं सांगू का विठ्ठला

किती लांबून लांबून तुला

भेटायला येतात

दरवर्षीचा नित्यक्रम ते

एकदाही चूकवत नाही

तू मात्र एकदाही

विटेवरू खाली उतरत नाही

असं का बरं……

 

*संजय धनगव्हाळ*

*कुसुमाई*

प्रतिक्रिया व्यक्त करा