*डॉ. शिवचरण उज्जैनकर प्रतिष्ठानचे सदस्य कवी शाहीर मनोहर पवार लिखित अप्रतिम पोवाडा*
*छत्रपती शाहू महाराज* (पोवाडा)
—————————
पहिले नमन छत्रपतींना । शाहू राजांना । शाहू राजांना ।
आरक्षणाचे जनक खास । दिला बहु जनांना विश्वास । जन्म दिला सत्यशोधक कार्यास जी॥ जी॥ १
कोल्हापूर संस्थान । मोठ्या । हिमतीन । राज्य उभारले खास ।
न्याय दिला गोर गरिबास जी॥ जी॥२
दीन दलीतांना घेवून ।
समस्या समजून ।’ कवटाळले छातीस ।
पाणी तलाव बांधले बत्तीस जी॥ ३
विधवा महिलांना । परितक्तांना । पिडीत शोषितांना । दलितांना दिले शिक्षण । तसेच रक्षण जी॥ जी॥ ४
असा लोकनेता । आरक्षण जन्मदाता । अंगी मानवता । किर्ती दिशा ती दाही । असा राजा पुन्हाहोणे नाही। रं जी॥ जी॥ ५
मुजरा शाहू राजास । अमर कार्यास । शुभेच्छा जन्म दिवसास । मुक्कामी केळवद गावात । शाहीरपवार गातो कवणास जी रं हा जी॥ ६
————————–
शाहीर मनोहर पवार केळवद .