You are currently viewing ओवी शेटे हिला लॉन्ग ट्रॅक स्पीड स्केटिंग मध्ये दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक

ओवी शेटे हिला लॉन्ग ट्रॅक स्पीड स्केटिंग मध्ये दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक

मुंबई :

मसुरे चांदेरवाडी येथे आजोळ असलेले आणि मूळ गुहागर येथील मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असलेली कुमारी ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड डेहराडून हिमाद्री आईस रिंक येथे 16 ते 23 जून या कालावधीत संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आईस लॉंग ट्रॅक्स स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके आणि आईस शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये दोन रौप्य पदके मिळवून गुहागर, मुंबई ठाणे, आणि मसुरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओवी शेटे हिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

ओवी शेट्टी ही मुंबई ठाणे येथील हिरानंदनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे. लहानपणापासूनच ओवी हिला आईस स्केटिंगची आवड होती. ओवी सध्या ठाणे येथील राईसा क्लब मध्ये स्केटिंगचं प्रशिक्षण घेत आहे. यासाठी तिला देशातील स्केटिंग चे प्रसिद्ध प्रशिक्षक राहुल पंदिरकर आणि तिची आई रीना सुदर्शन शेटे परब हिचे मार्गदर्शन लाभत आहे. ओवी हिने यापूर्वी अनेक जिल्हा राज्य नॅशनल आईस स्केटिंग आणि रोड स्केटिंग स्पर्धेमध्ये अजिंक्य पदे मिळविली आहेत. स्केटिंग मध्ये ओवी ही अगदी लहानपणापासूनच स्केटिंग चा सराव करत आहे.

ओवी ही गुहागर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश शेटे तसेच मसुरे चांदेरे आणि कुर्ला बैल बाजार येथील समाजसेवक श्री.बाबा परब यांची ती नात आहे. स्पर्धेदरम्यान सर्व स्केटर खेळाडूंनाना प्रसिद्ध प्रशिक्षक राहुल पंदिरकर यांनी मार्गदर्शन केले होते.तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत असून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. मसुरे चांदेरवाडी गावासाठी सुद्धा ओवी हिचे यश अभिमानास्पद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा