You are currently viewing सामाजिक बांधिलकी देणार ‘नाग्या महादू निवासी वसतिगृहा’ला मदतीचा हात

सामाजिक बांधिलकी देणार ‘नाग्या महादू निवासी वसतिगृहा’ला मदतीचा हात

सामाजिक बांधिलकी देणार ‘नाग्या महादू निवासी वसतिगृहा’ला मदतीचा हात

सावंतवाडी :

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडीकडून येत्या शनिवारी ४ जुलै २०२५ रोजी नाग्या महादू निवासी वसतिगृह (मु.पो.वेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ) येथील कातकरी आदिवासी समाजाच्या ८५ विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवून मदतीचा हात देणार आहे.

नाग्या महादू निवासी वसतिगृहाचे संस्थापक उदय आईर हे आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अनेक अडचणी असूनही, त्यांनी या मुलांना केवळ शिक्षणच दिले नाही तर त्यापैकी काही जणांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीही मिळवली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मुलांना सांभाळणे आणि त्यांना शिक्षण देणे हे अत्यंत खर्चिक काम आहे असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी नमूद केले. उदय आईर यांच्या या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. संस्थेने समाजातील दानशूर व्यक्तींना वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले आहे. संस्थेला शालेय वस्तू, खाऊ, पोहे, रवा, कपड्याचे व आंघोळीचे साबण, टूथपेस्ट, साखर, चहा पावडर, आणि कडधान्य यांसारख्या वस्तूंची आवश्यकता आहे. आपण दिलेल्या वस्तू काळजीपूर्वक मुलांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यांनी सर्वांना आपल्या इच्छेनुसार मदत करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा