You are currently viewing तिलारी घाटात ब्रेक फेल झाल्याने आयशर टेंम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला; दोघे जण गंभीर जखमी

तिलारी घाटात ब्रेक फेल झाल्याने आयशर टेंम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला; दोघे जण गंभीर जखमी

तिलारी घाटात ब्रेक फेल झाल्याने आयशर टेंम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला; दोघे जण गंभीर जखमी

दोडामार्ग

बेळगाव ते गोवा मार्गावरील तिलारी घाटात पुन्हा जीवघेणा एकदा अपघात घडून जयकर पॉईंट येथील धोकादायक वळणावर आयशर १०० फूट दरीत कोसळल्याने दोघे गंभीर जखमीं झाले आहे यापूर्वी या वळणावर अनेक अपघात घडले आहेत त्याच ठिकाणी पुन्हा अपघात घडला आहे.

शनिवारी दुपारी बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयचर टेम्पोच्या गाडीचे ब्रेक फेल होवून मोठा अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले. पण या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रेक फेल होवून ही गाडी १०० फुट खोल दरीत कोसळली आहे. या अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस हवालदार विजय जाधव व किरण आडे हे घटनास्थळी पोहचले. तिथे त्यानी गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनाने चंदगड रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा