सौ अनुपमा जाधव यांचा २७ जून हा वाढदिवस.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द लिहिण्याचा भाग्य मला प्राप्त झाल डहाणू येथील उपक्रमशील आदर्श शिक्षिका कथाकार बालकवयित्री समाजसेविका , सामाजिक कार्यकर्त्या , पर्यावरण प्रेमी.
या आपली नोकरी सांभाळून , घर संसार सांभाळून साहित्याच्या दुनियेत रमल्या आहेत.
सौ. जाधव यांची लोकक्रांती सेना प्रणालीत लोक क्रांती शिक्षण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्कपदी त्यांची निवड झालेली आहे तसेच त्यांची चार पुस्तकं प्रकाशित झालेली आहे.
१. समुद्रसंगीत काव्यसंग्रह
२. वहिवाट कवितासंग्रह.
३. अनुबंध कथासंग्रह.
४. रानझरा हा मराठी व अहिराणी बोलीभाषेतील कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे
तसेच मुंबई , पुणे , नाशिक केंद्रावर त्यांचे कविता वाचन व मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. डहाणू नगरपालिकेसाठी स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीतांची त्यांची निर्मिती केली असून त्यांची गाणी नगरपालिकेच्या घंटागाडीवर वाजवली जातात
सौ जाधव विद्यार्थी प्रेमी शिक्षिका असून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
राष्ट्रीय हरितसेनेचे त्या कार्य करत आहे. उपक्रम राबवीत असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता फुलते.. कथाकथन कसे करावे , टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू कशी तयार करावी. एक झाड एक विद्यार्थी. हिंदी परीक्षांचे आयोजन , गरजू विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालय प्रस्तुत प्राप्त करून देणे.
अशा विविध कार्यक्रमातून त्या सतत झिजत असतात , कार्य करत असतात.
त्या शिक्षिका मुलांची केवळ बाई नाही तर चिमुकल्यांची आई होऊन मायेची पाखरन करत असतात
आणि त्या मायेच्या प्रेमाने त्या मुलं घडवत असतात
मुलांशी असलेलं जीवाभावाचं हृदयाचं नात त्या शिक्षिकेचं वेगळं पण आधारित करत असतं. मुलांसाठी कविता गाणी गोष्टींचा भरपूर साठा आहे खाऊ आहे शिवाय कथाकथन त्यांच्याकडे उपजात अंग आहे. आकाशवाणी विविध शैक्षणिक सामाजिक साहित्यिक संस्थांमधून त्यांचे कथाकथन कार्यक्रम वाचन नियमित होत असतात. विविध उपक्रम राबवण्याच्या या शिक्षिका कथा निवेदक अहिराणी आणि राष्ट्रभाषा हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रसारक असून त्यांच्या या अनुबंधनात ऋण बंधनाचे एक आगळे वेगळे नाते असून समाजाच्या प्रति असलेली त्यांची बांधिलकी मुलांना घडवण्याचे व्रत समाजासाठी जाणीव जागृत करत असते.
त्यांच्या लेखणीतून विविध कंगोरे छटा त्यांच्या साहित्यात दिसून येतात , जाणवत आहे.
जीवन फुलवण्यासाठी त्यांची धडपड विलक्षण अशी आहे.
घरी लाभ चित्ती वसा सदगुणांचा अशा विचारांवर रूढ श्रद्धा ठेवण्याचा त्यांचा स्वभाव गुण त्यांच्या अनेक कवितेचा आत्मा होऊन जातो. त्यांच्या संघर्षात पूर्वतेची ओढ आहे असे सहजगत्या वाचकांना सांगून जाते.
त्यांचची लढण्याची वृत्ती भावनेतून रचता येते. सदगुण सुलभता वास्तविकता शिकवण अवघड होऊन जातं मोठे होण्याची उर्मी आपलं वेगळं पण लोकांच्या मनावर घर करून स्ववेदनेशील कविता जन्माला येतात
स्वतःचं दुःख हरवून अस्वस्थता त्यांना स्वस्त बसू देत नाही कवीची चळवळ हाच त्यांचा ध्यास आहे आणि यशस्वी माणूस तोच असतो जो स्वतःच्या यशात जो दुसऱ्याला उभा करतो आणि मार्गदर्शक होतो.
अशा या हळव्या हिरव्यागार मनाच्या कवित्री डहाणू निसर्गाच्या सानिध्यात राहतात समुद्र उशाशी घेऊन मुंबईची गर्दी पाहतात.
आणि त्यांचं शब्दांचे पीक जोरात उगवू लागतं.
उद्याच्या सूर्यनारायणाची किरण त्यांच्या अंगणात पडतील.
*पक्षांचे थव्यांचे मधुर गायन त्यांच्या कानी नेहमी ऐकायला मिळो…….*
*अंधकारातून उजेडाकडे घेऊन जाणारी पायवाट अधिक बळकट होओ……*
*यांच्या लेखणीला अजून बळ येवो आणि असंच सातत्य त्यांच्यात कायम राहो ……*
*फळांचा फुलांचा सुगंध घेऊन येणारी हवेची पहिली लाट त्यांच्या अंगणात दुर्मळो…..*
*त्यांना आरोग्यमय करून जाओ आणि दीर्घायुष्य लाभो ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा…..*
*ईश्वर पाटील✍🏿 शब्दगंध.*
*आकाशवाणी खमण सुरत….*
*मो . ९९९८५२५०७२*