You are currently viewing दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

*दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

दोडामार्ग

लोकराजा ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती व महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री नामदार भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कूलमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप आज दिनांक 26/06/2025 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज व महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री नामदार भाईसाहेब सावंत यांच्या प्रतिमांचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रल्हाद सावंत,जेष्ठ शिक्षक-श्री.रमाकांत जाधव,सौ.प्रतिक्षा नाईक,वरिष्ठ लिपीक -श्री.अर्जुन राणे व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. नामदार भाईसाहेब सावंत यांचा जीवन परिचय प्रशालेचे शिक्षक श्री.रमाकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना करून दिला. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा प्रशालेचे शिक्षक श्री अभिजीत उराडे यांनी करून दिला.
या कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तुळशीदास राऊळ सर यांनी, प्रस्तावित सौ.नाईक तर आभार प्रदर्शन -श्री .ए.एल.बामणीकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा