जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सावंतवाडीत जनजागृती रॅली…
सावंतवाडी
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सावंतवाडी शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह ४ अंमलदार आणि तब्बल १७० शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
ही रॅली भोसले गार्डन येथून सुरू झाली. त्यानंतर आरपीडी बाजारपेठेतून मार्गक्रमण करत, गांधी चौक आणि जयप्रकाश चौकातून परत भोसले गार्डन येथे येऊन समाप्त झाली. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल घोषणा दिल्या आणि फलक हातात घेऊन समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. या रॅलीमुळे अंमली पदार्थ विरोधी लढ्यात युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पोलीस प्रशासनानेही या उपक्रमाला पाठिंबा देऊन समाजातील या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला.