You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अधीक्षक डॉ दहिकर यांनी काढले आदेश; पीआय अतुल जाधव यांची कणकवली पोलीस ठाणे येथे बदली

ओरोस : सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश २४ जून रोजी काढले आहेत. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची कणकवली पोलीस ठाणे प्रभारी, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची कणकवली हून मालवण पोलीस ठाणे प्रभारी, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची मालवण मधून स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांची विजयदुर्ग येथून वैभववाडी पोलीस ठाणे प्रभारी, पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची बांदा येथून जिल्हा विशेष शाखा, एपीआय गजेंद्र पालवे यांची कुडाळ मधून बांदा पोलीस ठाणे प्रभारी, एपीआय संजय कातीवले यांची सावंतवाडी मधून विजयदुर्ग पोलीस ठाणे प्रभारी पदी, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची कणकवली पोलीस ठाणे मधून स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा