अध्यक्षपदी अपर्णा बोवलेकर तर सचिवपदी दिपाली वाडेकर यांची निवड
वेंगुर्ला :
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला च्या सन २०२५-२६ च्या नुतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा बुधवार दि. २५ जून रोजी संध्याकाळी ३.३० वाजता साई डिलक्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.वेंगुर्ले येथे नुकत्याच पार पडलेल्या इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला च्या सभेत सन २०२५-२६ या वर्षासाठी नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत अध्यक्ष पदी सौ. अपर्णा आनंद बोवलेकर व सचिव पदी सौ. दिपाली प्रितम वाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. हा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुण्या म्हणून वृंदा गवंडळकर या उपस्थित संपन्न होणार आहे. या सोहळ्यास सर्व स्तरावरील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ. मंजुषा आरोलकर व सचिव सौ. ज्योती देसाई यांनी केले आहे.

