*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*शुक्राची चांदणी*
मराठी साहित्य रत्नांच्या खाणीत सापडलेलं एक अनमोल रत्न म्हणजे ‘आपल्या’ अशा वाटणार्या शांताबाई.
आडनाव नाही लावलं?.. चालेल. लगेच डोळ्यासमोर प्रसन्न हंसणारा, कपाळावर मोठ्ठं कुंकू, डोक्यावरून पदर घेतलेला मराठमोळा चेहेरा लगेच ऊभा रहातो., आणि अभिमानाने अंगावर मूठभर मांस चढते.
जे काम साहित्यात असो, मुलाखत असो, किंवा काहीही पण मनापासुन जीव ओतुन करायच्या मग रसिक जन ‘आपलेसे’होतील तर नवल ते कसलं.
परिणाम असा कि, ते साहित्य, मुलाखत, कार्यक्रम काही असो पण प्रेक्षक व स्वत:शांताबाई रंगुन एक सुंदर रसिकतेचा मिलाफ होऊनच कार्यक्रम संपे.
आ. अत्रे यांच्याकडे संपादिका, प्राध्यापिका, लेखिका, कवयत्री, बालसाहित्य चित्रपठ गीते, साहित्य संमेलनाची अध्यक्षा, ग. दि. माडगुळकर व कुसूमाग्रज पुरस्कार , मुलाखत कार ,दुरदर्शन असे किती ठिकाणी हे रत्न झळकत राहिलं?
असंख्य पुरस्कार शिरपेचात असताना नाही अभिमान नाही मी पणा!
सर्व दिशांना पसरलेलं चतुरस्त्र व्यक्तिमत्व. नम्रता आपुलकी ऋजुता पुरेपूर भरलेली. म्हणुनच मी त्यांना ‘आपल्या’म्हणू शकले.
त्यांच्या साहित्यात अक्षरश:अलिबाबाच्या गुहेसारखं आत आत ओढले जातो…. घुसत रहातो… कथा कादंबरी, बालसाहित्य, चित्रपट गीते लावणी, व्यक्ती चित्रे आणि शिवाय अप्रतिम निसर्ग वर्णन या इतक्या अंगानी साहित्य असल्यावर कूठे थांबावं हेच कळत नाही. सगळंच ऊत्कृष्ट!
सगळं कसं तन्मय होऊन मनापासुन रसिकांसमोर मांडलेल.
व्यक्तिमत्व प्रभावी, लेखन तेजस्वी, भाषा ओजस्वी.
खरोखरच देवी. सरस्वतीचीच देणगी.
आजही तोच चंद्रमा नभात …. तरूणाईत काळजात कळ ऊठवते…
किलबिल किलबील पक्षी बोलती.. ऐकून लहान मुले नाचू लागतात तर मराठीच्या ओठी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशीदा ही लावणी अगदी ठेक्यात येते.
त्यांची चित्रपट गीते, बालगीते, अजरामर झालेत.
काव्यसंग्रह गाजले.
शिरपेंचात असंख्य पुरस्कार होते पण खरी मजा यायची ती दुरदर्शनवरच्यात्यांच्या मुलाखती ऐकताना.
मोकळ्या गप्पा, किस्से, गंमती जंमती, अशा काही रंगवत कि, आनंदाचा सोहळाच वाटे.
आम्ही नवागत किती लिहिणार?किती वाचणार?
तरी शांताबाई हे अद् भूत चरित्र अपूर्णच राहाणार.
अशा किर्तीवंत गुणवंत, प्रज्ञावंत आणि महाराष्ट्राला अभिमानास्पद असणार्या आदरणीय साहित्यरत्नाला विनम्र अभिवादन
अनुराधा जोशी.
अंधेरी. 69
9820023605