You are currently viewing उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सी.टी.स्कॅन मशीन दुरुस्ती आज रात्री 11 पासून रुग्णांच्या सेवेत पूर्ववत.

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सी.टी.स्कॅन मशीन दुरुस्ती आज रात्री 11 पासून रुग्णांच्या सेवेत पूर्ववत.

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सी.टी.स्कॅन मशीन दुरुस्ती आज रात्री 11 पासून रुग्णांच्या सेवेत पूर्ववत.

सावंतवाडी

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रुग्णांच्या सेवेत असलेल्या सी.टी.स्कॅन मशीनचा पार्ट खराब झाल्यामुळे गेले दोन दिवसापासून सी.टी.स्कॅन सेवा बंद होती. वारंवार लाईट ये जा करत असल्यामुळे सी.टी.स्कॅन मशीनचा पार्ट गेल्याची माहिती येथील सी.टी.स्कॅन ऑपरेटर यांनी दिली होती. परंतु आज रात्री नऊ वाजता मशीनची दुरुस्ती झाली असून आज रात्री 11 पासून सी.टी.स्कॅन मशीन रुग्णांच्या सेवेसाठी पूर्ववत करण्यात आल्याची माहिती येथील सी.टी.स्कॅन डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांना दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा