You are currently viewing हरकुळ बुद्रुक उर्दू स्कुलला स्कुलबस प्रदान…

हरकुळ बुद्रुक उर्दू स्कुलला स्कुलबस प्रदान…

आमदार नितेश राणेंची आणखी एक वचनपूर्ती

कणकवली

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अंजुमन ई- खुद्दामुल मुस्लिमीन हायस्कुल ला स्कुलबस प्रदान करत आमदार नितेश राणे पुन्हा एकदा आपली वचनपूर्ती करणार आहेत.
हरकुळ बुद्रुक येथील अंजुमन ई खुद्दामूल मुस्लिमीन हायकसुल या उर्दू स्कुलमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्कुलमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतुकीची मोठी गैरसोय होत होती. हरकुळ बुद्रुक च्या उर्दू हायस्कुलमध्ये हरकुळ पंचक्रोशीसह कणकवलीत तालुक्यातील विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी संस्थाचालकांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे स्कुलबस ची केली होती मागणी.त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी हरकुळ बुद्रुक येथील उर्दू हायस्कुल साठी स्कुलबस उपलब्ध करून दिली आहे.आज सकाळी ११ वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उर्दू हायस्कुल च्या संस्थाचालकांच्या उपस्थितीत स्कुल बस प्रदान केली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा