You are currently viewing गूड न्यूज! लॉकडाउनपूर्वी काढलेल्या पासलाशिल्लक दिवसांची मुदतवाढ

गूड न्यूज! लॉकडाउनपूर्वी काढलेल्या पासलाशिल्लक दिवसांची मुदतवाढ

मुंबई:

लॉकडाऊनपूर्वीचा लोकल पास शिल्लक असल्यास प्रवाशांना त्यामध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी सोमवार, 1 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.

सोमवारपासून म्हणजेच, उद्यापासून मुंबई लोकल (Mumbai Local) ची दारं सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाकडूनही सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच आणखी एक महत्त्वाचा निर्णय लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी घेण्यात आला आहे. यामुळे लोकलच्या जुन्या पासधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 24 मार्च 2020 पासून मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. परंतु, त्यापूर्वी ज्या प्रवाशांनी मुंबई लोकलचे एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचे पास काढले होते. अशा प्रवाशांची मुदत लॉकडाऊनमध्येच संपली आहे. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासना मुदतवाढ मिळणार की, नाही? असा प्रश्न सतत प्रवाशांकडून विचारला जात होता. मात्र, रेल्वे प्रशासनानं यासंदर्भात स्पष्टीकरण देत, प्रवाशांना पासची मुतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

लॉकडाऊननंतर रेल्वे पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना दिलासा मिळणार आहे.

 

1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलची दारं खुली

 

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदिल देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

कधी प्रवास करता येईल :

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

कधी प्रवास करता येणार नाही :

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Mumbai Local : मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवेला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदिल.

Mumbai Local | मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांना गुड न्यूज, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु

 

प्रतिक्रिया व्यक्त करा