You are currently viewing पर्यावरण मास साजरा करताना स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलगाव जंगलात केला वृक्षारोपण उपक्रम :

पर्यावरण मास साजरा करताना स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलगाव जंगलात केला वृक्षारोपण उपक्रम :

*पर्यावरण मास साजरा करताना स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलगाव जंगलात केला वृक्षारोपण उपक्रम :**

सावंतवाडी

पृथ्वीवरील सर्व सजीव या आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच पर्यावरणाच्या सहवासात राहतात. त्यामुळे सर्व सजीवांच्या हितासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. जून महिना हा पर्यावरण महिना म्हणून साजरा केला जातो या दिवशी तेव्हा या पर्यावरण मासानिमित्ताने वनासंबंधीची माहिती मिळण्यासाठी, ऑक्सीजनची निर्मिती व पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी म्हणून वनविभागाशी समन्वय साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या समन्वयक सौ. सुषमा पालव व सहा. शिक्षिका कु. उमा बोयान यांच्या उपस्थितीत इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी कोलगावच्या जंगलात सुरंगी व वडाच्या झाडांची लागवड केली. तसेच वनविभागातर्फे विद्यार्थ्यांना श्री. प्रमोद राणे सर व श्री. भोजणे सर व त्यांचे सहकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील माहिती देऊन समजावून सांगितले की, ही झाडे जगायला थोडा उशीर होतो. पण ही झाडे एकदा जगली की तिचे आयुष्य २०० ते ३०० वर्षांचे असते. ही विस्तीर्ण होतात, त्यामधून परागीभवन होते. तसेच मधमाशांना त्यांचे अन्न म्हणजेच मध प्राप्त होते. वडाच्या झाडांच्या एकेका मुळात १०० ते २०० लिटर पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण सुरक्षित राहते. वडाच्या झाडाच्या आसपास विहीर असल्यास त्या विहिरीला भरपूर पाणी उपलब्ध होते. हे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहे त्यामुळे त्याचे संवर्धन करणे ही आपली व येणाऱ्या भावी पिढीची जबाबदारी आहे. या झाडांचे जतन करून आपल्या पुढच्या पिढीसाठी हा वारसा आपण टिकवून ठेवू शकतो. ही संकल्पना प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी मांडली व या वृक्षारोपण उपक्रमात प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे, आपण या झाडांसाठी कोलगाव जंगलात वसुंधरा दिनानिमित्त एप्रिल महिन्यात जे जलस्त्रोत म्हणून जे जंगली प्राण्यांसाठी दोन पाणवठे तयार केले होते. त्यालाच लागून हा जून महिन्यात पर्यावरण दिन आला असून पर्यावरणाशी सतत नाळ जोडलेली असावी हीच प्रशालेतील संचालकांची संकल्पना असल्याकारणाने व वृक्षारोपण केलेली झाडे जगवणे हा त्याचा पुढचा टप्पा असल्याने हा टप्पा देखील विद्यार्थ्यांनी अनुभवावा यासाठी त्या माध्यमाने पावसाळ्याचा ऋतू संपल्यानंतरही पाण्याची व्यवस्था करून झाडांचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करू असे विशद केले. वनविभाग अधिकाऱ्यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना गूळ व शेंगदाण्याचे नैसर्गिक पद्धतीने बनविलेले लाडू देऊन शरीरास पौष्टिक असे अन्नपदार्थ सेवन करण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून दिले. निसर्ग संवर्धनाचा श्री. रुजुल पाटणकर यांचा कल असून त्यातूनच विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण मिळावे याकरिता हा उपक्रम राबवण्याची ही उत्तम संधी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. अशाप्रकारे त्यांची ही संकल्पना राबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा