ठाणे :
ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांनी S R Creations या युट्युब चॅनेल करता “तेरा मेरा साथ रहे” हे हिंदी गाणे लिहिले होते. ते गाणे 20 जून रोजी S R Creations कडून प्रदर्शित झाले आहे.
“म्यूझिकवाले” यांनी या गाण्याला संगीतबद्ध
केले आहे. सपना भोईर, राहुल देवके या दोन कलाकारांनी अभिनय साकारला आहे. ठाण्यातील दिग्दर्शक अभिजीत हरळीकर यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. या प्रस्तुत गाण्याचे छायाचित्रण साहिल सावंत यांनी केले आहे तर अनिकेत सूर्यवंशी यांनी निर्मिती सहाय्य केले आहे. त्याचबरोबर जय भोईर आणि वैष्णवी पाटील यांनी व्यवस्थापन सहकार्य केले आहे. पनवेल मधील “आपटा” गावात या गाण्याचे चित्रीकरण झाले होते. या गावातील गावकऱ्यांनी ह्या गीत प्रोजेक्टचे उत्साहाने स्वागत केले आणि प्रतिसाद दिला. S R Creations मधून सपना भोईर, राहुल देवके यांनी आपल्या करिअरची नवीन सुरुवात केली आहे.
एडवोकेट रुपेश पवार हे साहित्यिक, पत्रकार असून
त्यांनी आत्तापर्यंत नऊ पुस्तकांची निर्मिती केली आहे. यात पाच ई बुक व चार मुद्रित पुस्तकांचा समावेश आहे. आता त्यांचे “स्त्री जीवनाची गाथा” (रामायण महाभारत) हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्या आधी “तेरा मेरा साथ रहे” हे रुपेश पवार यांचे हिंदी गाणे प्रदर्शित झाले आहे. पवार यांनी मराठी बरोबर हिंदी गाणी ही लिहिली आहेत. त्यातील हे पहिले त्यांचे हिंदी गाणे आहे. त्या आधी त्यांचे “ही सांज बघ ढळते आहे” हे गाणे प्रदर्शित झाले होते. गीत रसिकांनी या गाण्याचा आनंद घ्यावा. आपल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना हे गाणे जरूर ऐकायला द्यावे.
रुपेश भै. पवार
चंद्रदर्शन हौसिंग सोसायटी, किसन नगर -३, रोड -१६
वागळे इस्टेट, ठाणे ४००६०४.
फोन ०२२-२५८१०७९ मो. ९९३०८५२१६५
