मालवण कुंभारमाठ येथे सापडले नवजात मुलगी अर्भक
मालवण :
कुंभारमाठ येथे एक नवजात मुलीचे जिवंत अर्भक मिळून आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.
एका आंब्याच्या बागेत सकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने लगतच्या घरातील व्यक्ती गेल्या तेव्हा एक बाळ त्यांना दिसून आले. एका दिवसाचे हे बाळ आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. बाळ ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. बाळ सुरक्षित आहे. सुदैवाने कुत्रे व अन्य कोणी प्राण्याने त्याला दुखापत केली नाही.
दरम्यान याबाबत तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.