सिंधुदुर्ग:– ‘ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद २०२५’ हा कार्यक्रम ‘मी उद्योजक होणारच’ या संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात येत आहे. भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी लाभलेलं व्यक्तिमत्त्व लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम असेल. हा कार्यक्रम मंगळवार, १७ जून रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), मुंबई येथे होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून उद्योजकता, नवकल्पना आणि नेतृत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तसंच नवउद्योजकांना यशस्वी उद्योजकांचं ज्ञान आणि अनुभव जाणून घेण्याची संधी मिळते. सदर कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ. सुरेश हावरे, रवींद्र प्रभुदेसाई, डॉ. अजित मराठे, कैलास काटकर, संतोष पाटील, विरेंद्र पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा समृद्ध आणि अभिजात आहे, त्याचबरोबर ती श्रीमंतसुद्धा आहे, हे दर्शवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड झाल्याबद्दल समस्त जिल्हावासियांकडून त्यांचे अभिनंद करण्यात आले आहे.

ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद २०२५ साठी ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
- Post published:जून 16, 2025
- Post category:बातम्या / मुंबई / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like

आंबोली व कलंबिस्त येथे वीज ग्राहकांच्या विभागीय बैठकीचे उद्या आयोजन

प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी राज्यशास्त्र विषयावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र

आम्ही सिध्द लेखिका पुणे विभाग दुसरे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनातील उद्घाटक मा.उषा चांदूरकर यांचे भाषण
