आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर; कबूलयतदार प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित
सावंतवाडी : आंबोली येथील हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ उपसा न झाल्यामुळे आंबोली परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी दिली. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली गावात उगम पावणारी हिरण्यकेशी नदी पात्र ओलांडून वाहू लागली आहे. गेले 3-4 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सवत्र पाणीच पाणी झाले आहे. आंबोली गावातील ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन सौ. पालेकर यांनी ग्रामस्थांना व पर्यटकांना केले आहे.
आंबोली हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ गेली कित्येक वर्षे उपसा न झाल्यामुळे दरवर्षी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच येथील कबूलयतदार प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना पूर परिस्थिती मुळे होणारे शेत पिकांचे नुकसान ही भेटत नाही. प्रशासनाने याबाबत ठोस कार्यवाही करावी अशी मागणी आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केली आहे.

