You are currently viewing ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद 2025 चे 17 जून रोजी आयोजन 

ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद 2025 चे 17 जून रोजी आयोजन 

ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद 2025 चे 17 जून रोजी आयोजन

*ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद 2025* ह्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व किर्लोस्कर यांच्या १५६ व्या जयंती विशेष कार्यक्रम *मी उद्योजक होणारच* ह्या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.
ह्या कार्यक्रमामध्ये अग्रगण्य मराठी उद्योजकांना त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी व महाराष्ट्र तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानासाठी व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
या दिवसाच्या माध्यमातून उद्योजकता , नवकल्पना आणि नेतुत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तसेच नवउद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे ज्ञान आणि अनुभव जाणून घेण्याची संधी मिळते.
सदर कार्यक्रमात *उद्योगमंत्री उदय सामंत , कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ.सुरेश हावरे, रवींद्र प्रभुदेसाई, डॉ.अजित मराठे, कैलास काटकर, श्री.संतोष पाटील, श्री.विरेंद्र पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठी भाषा समृध्द आणि अभिजात आहे. त्याच बरोबर ती श्रीमंत सुद्धा आहे हे दर्शवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
*सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी दुपारी ३.०० ते सायं. ८. ०० या वेळेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मुंबई येथे होणार आहे.*
*कार्यक्रम विनामूल्य आहे.* मात्र नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र टाइम्स ह्या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.
तरी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक ओपन करून आपली नाव नोंदणी करा.
https://forms.gle/FFyaJf2bDAeyFNDH7 अधिक माहितीसाठी संपर्क 7400119436

प्रतिक्रिया व्यक्त करा