*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
आभाळ
बाप नावाचं आभाळ
सदाच सावली धरतं
स्वतः झेलतो ऊन
घरटं सुरक्षित ठेवतं…
असतं तेव्हा कळत नाही
हरवलं की समजतं
केवढा आधार होता
आपलं कुणीच जगी नसतं…
घर त्याचही असतं
पण सतत बाहेर राबतो
कुटुंबाच्या भल्यासाठी
सदैव झिजत राहतो….
बाप असतो काळा कातळ
ममत्व त्याचे ह्रदयात
वेळ येताच झुळझुळते
मायेची गंगा काळजात….।।
अरुणा दुद्दलवार✍️
