You are currently viewing भटवाडी येथे सुरक्षा रक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

भटवाडी येथे सुरक्षा रक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

भटवाडी येथे सुरक्षा रक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

सावंतवाडी

भटवाडी येथील वनश्री अपार्टमेंट मध्ये ड्युटी बजावत असलेल्या सुरक्षारक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजता घडली. सुरेश विठोबा जाधव (रा.आंबेगाव) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पुंडलिक जाधव यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील मृत झालेले जाधव हे वनश्री अपार्टमेंट मध्ये सुरक्षारक्षकाचे काम करत होते. त्याठिकाणी काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली व ते बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांना हृदय विकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा