You are currently viewing करुळ (गगनबावडा) घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण – पालकमंत्री नितेश राणे

करुळ (गगनबावडा) घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण – पालकमंत्री नितेश राणे

तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्याच्या जमीन ‌भुसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली :

वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे. या मार्गातील तळेरे- वैभववाडी रस्त्याच्या भुसंपादनाबाबत गांवकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने रस्त्याच्या हद्दीबाबत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी यांनी कागदपत्रे तपासून प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली,माजी आमदार अजित गोगटे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्त्याच्या भुसंपादनाच्या अनुषंगाने पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, तर भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, वैभववाडी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, कणकवली मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, भालचंद्र साठे, गुलाबराव चव्हाण, भाजपा पदाधिकारी मनोज रावराणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संतोष कानडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र राणे, वैभववाडी युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, कोकिसरे सरपंच प्रदीप नारकर, नाधवडे सरपंच कु. पांचाळ, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, नगरसेवक रणजीत तावडे, संगीता चव्हाण, व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

करुळ ते नाधवडे दरम्यान सन १९६९ ला कजाप झाला आहे. परंतु तो ७ मीटर ने करण्यात आला आहे. आणि सद्यस्थितीत १६ मीटरने रस्ता रुंदीकरणात घेण्यात आला आहे. त्यामुळे जमीन मालकांना भूसंपादनाचा मोबदला मिळावा, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा