You are currently viewing खोपा विणते शब्दातून

खोपा विणते शब्दातून

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खोपा विणते शब्दातून*

 

आणते चोचीत

सुंदर शब्द वेचून

खोपा विणून

सुबक….

 

कल्पनेच्या आभाळात

उंच भरा-या घेते

साहित्य शोधते

विविध…..

 

डेरेदार फांदी

निवडते मजबूत विचारांची

भिस्त खोप्याची

त्यावरच….

 

विणते खोपा

लक्ष देते सभोवार

शब्द अलवार

निवडते….

 

सुरक्षित ठेवते

खोप्यात माझा खजिना

अनमोल रचना

कल्पक…..!!

 

§§§•••••§§§~~~§§§

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा