सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वर्षभरात सी. टी.स्कॅन मशीन द्वारे 9000 पेक्षा जास्त रुग्णांना विनामूल्य सेवा
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सी. टी.स्कॅन मशीनला एक वर्ष पूर्ण तर 9000 पेक्षा जास्त रुग्णांना विनामूल्य सेवा मिळाली.
रुग्णांना सी.टी.स्कॅन चाचणीसाठी प्रायव्हेट मध्ये तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत होते ते गोरगरीब रुग्णांना परवडण्यासारख नव्हत हा विषय लक्षात घेऊन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यशस्वीरित्या पाठपुरावा करून सदर सिटीस्कॅन सेवा सुविधा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये विनामूल्य 24 तास सावंतवाडी, गाव व जवळच्या इतर शहरातील रुग्णांना उपलब्ध करून दिली. सदर सेवेचा लाभ आजपर्यंत 9000 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला. आज या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे.
. येथील सी.टी.स्कॅन ऑपरेटर स्टाफ 24 तास रुग्णांना सेवा देत आहेत. ही सेवा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर सी.टी. स्कॅन तपासणी सेवा सी.टी.स्कॅन डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब,नर्स आकांशा कांनसे, परशुराम कांबळे टेक्निशियन, शुभम कट्टीकर रिसेप्शन व हाउसकीपिंग स्वप्निल गिडमणी यांच्याद्वारे ही सेवा 24 तास दिली जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे मत्स्ययव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याजवळ युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील खराब झालेल्या स्वच्छतागृह व त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा केला होता त्याची वेळेत दखल घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी सात लाख इतका तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दोन्हीही संघटनांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व देव्या सूर्याजी यांनी आरोग्य मंत्री आबिटकर यांची भेट घेतली होती त्यामुळे हॉस्पिटल संदर्भात काही प्रश्न मार्गी लागत आहे.
. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णपयोगी साहित्यासहित विविध सेवा पुरवली जाते परंतु या रुग्णालयामध्ये फिजिशियन अजूनही उपलब्ध नसल्यामुळे काही रुग्णांना प्राण गमावे लागतात तर काही रुग्णांना गोवा बांबुळी गाठावी लागते. येथील स्थानिक आमदार व माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आपण फिजिशियन साठी प्रयत्न केले परंतु यश मिळाले नाही आता पत्रकारांनी फिजिशियन उपलब्ध करून द्यावा असे सुचवले असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा पत्रकार संघ ओरस या ठिकाणी जाऊन आमच्या पत्रकार बंधूना निवेदन देऊन लवकरात लवकर फिजिशियन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. जेणेकरून फिजिशियन लवकर उपलब्ध झाल्यास येथील रुग्णांचे जीव वाचू शकतात असे रवी जाधव म्हणाले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*
संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,
संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी
या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.
वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– उच्चशिक्षित प्राध्यापक
– हवेशीर वर्गखोल्या
– परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– १००% नोकरीची हमी
– उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170641/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

