*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन तृप्त झाले*
तुझ्या येण्याने
मन तृप्त झाले
आई मिळाले
बिरूद…
तुझ्या थेंबांनी
रोप नवे फुलले
तृप्त झाले
मन….
सोनसळी किरणे
धरेने सुंदर माळली
तृप्त झाली
शृंगाराने….
मन तृप्त
बहरला जेव्हा संसार
एकमेकांचा आधार
मिळाला…..
टाळ मृदंग
वारीत नाचली पावले
तृप्त झाले
ह्रदय….
०००००००००००००
अरुणा दुद्दलवार दिग्रस
यवतमाळ
