You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

कणकवली

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी ३.२० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ४ वाजता भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी सरकार स्थापनेस ११ वर्षे पूर्ण झाल्याने सेवा व सुशासनाबद्दल पत्रकार परिषदेस उपस्थिती. (स्थळ :- प्रहार भवन, कणकवली). सायं. ५ वाजता तळेरे, वैभववाडी, गगनबावडा रस्त्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. (स्थळ:- शासकीय विश्रामगृह, कणकवली).

प्रतिक्रिया व्यक्त करा