You are currently viewing जंटल मन

जंटल मन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जंटल मन*

 

जडले त्याच्यावर ह्या वेडीचे ग मन

पाव्हणा मीरारोडचा दिसतो जंटल मन l

 

नाही राहीला जरी गडी तरुण

चुकला तर धरता येईल कान

घोड नवरा असूद्या मला दिसेल शोभून

पाव्हणा मीरारोडचा दिसतो जंटल मन l १ l

 

फिरविल गाडीतून भूलभुलैया मुंबई

आईला आवडेल हा मुंबईचा जावई

माझ्यासाठी करील कविता मस्त छान

पाव्हणा मीरारोडचा दिसतो जंटल मन l २ l

 

सख्यांना वाटेल हेवा असा तो विद्वान

सारखा बोलतो प्रेमाने मला जानेमन

करील अमाप प्रेम जशी धरती अंशुमन

पाव्हणा मीरारोडचा दिसतो जंटल मन l ३ l

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा