वेंगुर्ले एस.टी. आगारात ५ नव्या एस.टी. गाड्यांचा शुभारंभ…
वेंगुर्ले
एस.टी. आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या ५ नव्या एस.टी. गाड्यांचा शुभारंभ आज ठाकरे शिवसेने तर्फे विधानसभा अध्यक्ष रूपेश राऊळ आणि एस.टी. कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार महेश सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे या बस वेंगुर्लेला मिळाले, असे यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.
वेंगुर्ले एसटी आगारात झालेल्या या शुभारंभ कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संदेश निकम, युवासेना तालुका प्रलुख पंकज शिरसाट तसेच अजित राऊळ, चंद्रकांत कासार, शैलेश परुळेकर, संदिप केळजी, गजू गोलतकर, सुजित चमणकर, संदिप पेडणेकर, मकरंद गोंधळेकर, दिलीप राणे, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, रोहन मल्हार, आर्यन राऊळ व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी गाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी फोनवरून आमदार महेश सावंत यांचे आभार मानले.