You are currently viewing वट पौर्णिमा

वट पौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वट पौर्णिमा*

 

अखंड सौभाग्य लाभू दे ग मला

मनोभावे पूजिते आज मी वडाला l

 

धनी माझा आहे मनाने ग निर्मळ

स्वभावाने गोडगोड अतिशय प्रेमळ

माझेही आयुष्य लाभू दे ग त्याला

मनोभावे पूजिते आज मी वडाला l

 

वट पौर्णिमेला करीते ग उपवास

सत्यवान सावित्रीला आठवून खास

सुती धागा गुंडाळते बाई त्याला

मनोभावे पूजिते आज मी वडाला l

 

सात फेरे भोवती स्त्रीत्वाचे प्रतिक

व्रत हे शुभंकर स्त्रियांसाठी एक

वाण वाटते मी सौभाग्य रक्षणाला

मनोभावे पूजिते आज मी वडाला l

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा