You are currently viewing नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली आयोजित कै. श्री. बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु. सोहम देशमुखची घेतली उंच भरारी :

नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली आयोजित कै. श्री. बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु. सोहम देशमुखची घेतली उंच भरारी :

*नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली आयोजित कै. श्री. बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु. सोहम देशमुखची घेतली उंच भरारी :*

सावंतवाडी

नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली आयोजित कै. श्री. बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा कु. सोहम देशमुख याने तेरा वर्षाखालील वायोगटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी बापट बाल मंदिर, सांगली येथे पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून २२६ स्पर्धक सहभागी झाले होते. वरील स्पर्धेमध्ये एकूण ९ सामने झाले व त्यामध्ये प्रशालेतील विद्यार्थी कु. सोहम देशमुख याने ५.५ एवढे गुण प्राप्त केले. या स्पर्धेत कु. सोहम देशमुख याने फिडे आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये तब्बल ७३ गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्याला चषक व रोख १०००/- रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा