– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील 69 सोनोग्राफी केंद्र आणि 30 गर्भपात केंद्रांची तिमाही तपासणी 100 टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. पीसीपीएनडीटीच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी जिल्हा शल्यत चिकिस्तक डॉ. चव्हाण यांनी ही माहिती दिली.
या बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सर्व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व सर्व ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सावंतवाडी येथील न्यायालयात दाखल करण्यात अलेल्या अष्टांग डायग्नोस्टिक सेंटरच्या न्यायलयीन प्रकरणाविषयी चर्चा करण्यात आली. सोनोग्राफी केंद्रातर्फे शासकीय संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यात येणाऱ्या एफ फॉर्मचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये साईलिला हॉस्पिटल, नाटळ, कणकवली, पाकळे हॉस्पिटल, कणकवली, सुयश हॉस्पिटल फोंडाघाट, कणकवली या रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशिन नसल्याचे आढळून आले. या तीन केंद्रांची नोंदणी सल्लागार समितीच्या सल्ल्याने पूर्णतः परद्द करण्यात आली आहे. तसेच संजीवन रुग्णालय, खारेपाटण, ग्रामिण रुग्णालय, मालवण, येथील सोनोग्राफि केंद्रांमध्ये सोनोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने आणि ग्रमिण रुग्णालय वेंगुर्ला, कुडाळ, देवगड आणि दोडामार्ग, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, राणी जानकी बाई वै.आ.संस्था, सावंतवाडी येथील सोनोग्राफि मशीन नादुरुस्त असल्याने येथील केंद्रांवरील सोनोग्राफी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.