प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले स्पेलबी स्पर्धेत उल्लेखनीय यश
सावंतवाडी
स्पेलबी स्पर्धेत प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खरोखरच उल्लेखनीय आहे! त्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे,
LKG मधील –
१. स्टेपिंग स्टोन प्रीस्कूल बांदा येथील, कु. मनवा सावंत हिने राज्यस्तरावर पहिला क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर ११ वा क्रमांक पटकावला.
२. स्टेपिंग स्टोन प्रीस्कूल बांदा येथील, कु. आराध्या बिद्ये हिने राज्यस्तरावर द्वितीय व राष्ट्रीय स्तरावर १२ वा क्रमांक पटकावला.
३. वाॅव किड्स रयान प्रीस्कूल येथील, कु. आराध्या सावंत हिने राज्यस्तरावर चौथा व राष्ट्रीय स्तरावर १४ वा क्रमांक पटकावला.
UKG मधील –
१. स्टेपिंग स्टोन प्रीस्कूल बांदा येथील, कु. अनुज सावंत याने राज्यस्तरावर चौथा व राष्ट्रीय स्तरावर १६ वा क्रमांक पटकावला.
🌟 राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील यश हे त्यांच्या समर्पणाचे आणि प्रतिभेचे प्रतीक आहे.
आमचे तरुण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे कौतुक – तुमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. उत्सुकता आणि शिकण्याची आवड वाढवत राहा!