मालवण
सागरी सुरक्षा मोहिमेच्या निमित्ताने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एनसीसी विभाग तसेच फिफ्टी महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग व सागरी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमानाने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा दल बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले व प्रात्यक्षिकेही करून दाखवण्यात आली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सागरी सुरक्षा मोहीम नुकतीच पार पडली. २६/११ सारख्या सागरी मार्गाने भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्या सारख्या घटना घडू नयेत यासाठी सागरी सुरक्षा मोहीम घेण्यात आली. दोन दिवस रेड टीम व ब्ल्यू टीम असे दोन विभाग पाडून इंडियन नेव्ही , सागरी सुरक्षा दल व एनसीसी कॅडेट यांच्यावतीने संरक्षण संदर्भात सराव घेण्यात आला. यासाठी पीएसआय श्री. साठे, सागरी सुरक्षा दल, के. काळे, महाराष्ट्र बटालियन आर्मीचे सुभेदार गोविंद व लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत आदींनी विशेष प्रयत्न केले.