सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेच्या मागणीला अखेर यश
अनुदानित शाळांनी शैक्षणिक साहित्य विक्री केल्यास कारवाई – शिक्षणाधिकाऱ्यांचा अध्यादेश
शैक्षणिक साहित्य विक्री संघटनेने वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेच्या मागणीला अखेर यश आले आहे. अनुदानित शाळांमधून होत असलेली शैक्षणिक साहित्य विक्री करण्यात येऊ नये अशी विनंती सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तसेच शिक्षण विभागाकडेही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र सावंतवाडी येथे या संघटनेने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांनी अध्यादेश काढला आहे. जिल्ह्यातील नामांकित शाळांनी तसेच सर्व शाळांमधून कुठल्याही प्रकारची वही ,पेन अथवा शैक्षणिक साहित्याची विक्री करू नये असे केल्यास संबंधित अनुदानित शाळांवर कारवाई करण्यात येईलअसे त्यांनी अध्यादेशात स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सहा नामांकित अनुदानित सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. मात्र, हा अध्यादेश सर्व शाळांना लागू आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये वह्या विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेच्या मागणीला अखेर यश आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन शिक्षणाधिकारी यांना तशा सूचना केल्याबद्दल पालकमंत्री श्री राणे यांचे अभिनंदन संघटनेने केले आहे. या अध्यादेशामुळे शाळांना आता विद्यार्थ्यांना वह्या घेण्याची सक्ती करता येणार नाही.