*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आपले पर्यावरण*
पर्यावरणाने मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत सोयीसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, बेदरकारी, अडाणी,घ बेफिकीर, निर्धास्त आणि अविचारी वृत्तीने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा र्हास केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत..
पर्यावरणीय व्यवस्थेत असंतुलन निर्माण होऊन प्राणीमात्रास धोका उत्पन्न होत आहे. जल, हवा, ध्वनी, भूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. औद्योगिक व रासायनिक दुषितीकरणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत /वाढलेले आहेत. ओझोन वायूचा क्षय, आम्लपर्जन्य, सागरी परिसंस्थेचा असमतोल, प्राणी व पक्षी नामशेष होणे इत्यादी समस्येसोबतच वातावरणात आकस्मिक बदल हे नित्याचेच झाले आहे . त्यामुळे रोज नवे संकट आपणांसमोर तोंड वासून उभे असते. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकांनी सावधरित्या पाऊल उचलणे गरजेचे आहे… सर्वप्रथम “मी” पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. .. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुंटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेऊन वागतो त्यामुळेच त्या कुंटुंबात सुख समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागली तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. त्याच प्रमाणे पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे. ..असे वाटतं नाही काय ? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे ही भावना मनात जागरूक असायला हवी.. घरे बांधण्यासाठी जमिन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते.
त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो…पर्यावरणातून आपणांस हवा, पाणी आणि नैसर्गिक समृद्धी मिळते ज्याद्वारे आपण चांगले जीवन व्यतीत करू शकतो.
पाण्याची बचत व त्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय ही प्रत्येकांनी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. ” ” पाणी अडवा पाणी जिरवा ” यांसारख्या उपक्रमाची प्रत्येकांना जाणीव करून देणे क्रमप्राप्त आहे…आपण अन्नाशिवाय एखादा दिवस व पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो मात्रं हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि हे ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायक्साईड म्हणजे खराब हवा वायू शोषून मानवास ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होतांना दिसते. जंगल वाचविण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ”चिपको आंदोलन” चालविले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. . वृक्षांचे महत्व अपरंपार आहे हे आपले पूर्वज सुद्धा जाणून होते..
संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ”वृक्षवल्ली, आम्हां सोयरी..” खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे कां? वृक्षांच्या महत्वाविषयी आपले पूर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे… पूर्वी सकाळी पक्ष्यांची चिवचिव -पक्षांच्या किलबिलिच्या आवाजाने जाग यायची. मला मात्र आजही त्यांच्या आवाजाने जाग येते बरं आणि हा आवाज नैसर्गिक आहे बरं का ?…
मोबाईलमुळे खूप दूरवरचे मित्र, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि पाहुणे हे सर्व आपल्या जवळ
असल्यासारखा भास होत आहेत आणि आपल्या सहवासात असलेला निसर्ग मात्र दूर गेलेला आहे.. निदान आपण वनाचे संरक्षण करण्यात जर यशस्वी झालो तर पशू-पक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल. आपल्या जीवनाप्रमाणे पशू-पक्ष्यांचे ही जीवनसुध्दा महत्वाचे आहे हे कसं विसरून चालेलं नाही का ?
नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौर उर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अश्या सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल.. आज ज्या सौर उर्जेचा वापर नगण्य स्वरूपात आहे.. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनांच्या मदतीने वापर करता येऊ शकतो आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकतो..
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपल्याला पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, कतरीनासारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ, रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे जाणवत आहे.. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु….
लेखिका / कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
