*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्ग खवळला तर*
निसर्ग खवळता
सर्व चराचरावर परिणाम
बिनसते काम
सृष्टीचे…..
अवकाळी पाऊस
उभ्या पिकाला झोपवितो
नुकसान करतो
कास्तकाराचे…….
नद्यांना महापूर
गावेच्या गावे उध्वस्त
जनता त्रस्त
रडवेली…..
कधी वणवा
जंगलाला भीषण जळे
पाणी पळे
तोंडचे…..
पर्यावरण समतोल
फारच आहे महत्त्व
निसर्गाचं तत्व
श्रेष्ठ…..!!
~~~~~~~~~~~~~~~~
*अरुणा दुद्दलवार@*✍️

