You are currently viewing पाऊस गाणे

पाऊस गाणे

*ज्येष्ठ साहित्यिका चित्रकारा स्वप्नगंगा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस गाणे*

 

सळसळणार्या पानांना ही

स्पर्शुन जातो उनाड वारा

गुपित कोणते सांगत फिरतो

याचे त्याचे करीत देई गुंगारा।

 

सळसळणार्या लाटांना ही

न आवरे मोह, हृदयीचे गुपित

उचंबळून येती वरचेवर ही

किनाऱ्यावर फेसाळत धावत।

 

क्षितिजाचेही तेच हाल होती

आकाश झेपाळले वसुंधरेवर

थांग तयाचा कुठे लागेना धरती

अविरत झेपावते ते अवनीवर।

 

प्रपात कोसळती गिरिदुर्गातून

सरितावाहे निर्झरा कुशीतघेऊन

पर्जन्यमान जाई धरणे ओलांडून

जलमय सृष्टीजाईअवाकहोऊन।

 

पर्जन्याचे अविरत निखळ येणे

वाटे उगा हे असतील कांबहाणे

खळबळ सृष्टीवरती पसरविणे

कधी असते त्याचे रुसुन बसणे।

 

 

🪷🌧️पाऊसगाणे🌧️🪷

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई ।। विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा